पनवेल - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी मनसैनिकांनी केली आहे. शहरात जागोजागी स्वागत कमानी, डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यातच पनवेलमधील काही मनसैनिकांची चमकोगिरी फटा पोस्टर निकला झिरो, अशीच झाली.
पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची पोस्टरद्वारे 'मनसे' चमकोगिरी, महापालिकेने हटवले डिजिटल बोर्ड - व्हिडिओ
मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष महेश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे स्वागत करणारे काही बॅनर्स सायन-पनवेल महामार्गावर लावले होते. मात्र परवानगी न घेता लावण्यात आलेले हे बॅनर्स महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकले.
![पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची पोस्टरद्वारे 'मनसे' चमकोगिरी, महापालिकेने हटवले डिजिटल बोर्ड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3107510-655-3107510-1556205335119.jpg)
राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पनवेलमध्ये होणार आहे. पनवेलच्या कामोठेतील गणेश मैदानात रात्री 8 वाजता ही सभा सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पनवेलमध्ये सर्व महत्त्वाचे रस्ते आणि चौकात पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावण्यात आले होते. मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष महेश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे स्वागत करणारे काही बॅनर्स सायन-पनवेल महामार्गावर लावले होते.
उत्साहाच्या भरात चमकोगिरी करताना मनसे कार्यकर्त्यांनी विनापरवाना लावलेले हे बॅनर्स पनवेल महापालिकेने लगेच काढून या उत्साही कार्यकर्त्यांच्या चमकोगिरीला चाप बसवला. नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे, महाड, मुंबई येथे प्रचाराचे मैदान गाजवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची तोफ आज पनवेलमध्ये धडकणार आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या राज यांनी व्हिडिओ दाखवत लाव रे तो व्हिडिओ म्हणत 'पोल खोल अभियान' छेडले आहे. त्यामुळे आजच्या पनवेलमधील सभेत राज ठाकरे हे कोणती नवीन पोल खोल करणार, याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू होताना दिसत आहे.