महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेण तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

समाजसेवक व रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचीका व अहिल्या महिला मंडळाच्या अश्विनी गाडगीळ यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

राजू पिचिका यांचा सन्मान करताना पालकमंत्री आदिती तटकरे
राजू पिचिका यांचा सन्मान करताना पालकमंत्री आदिती तटकरे

By

Published : Aug 15, 2020, 8:09 PM IST

पेण (रायगड) - कोरोनाच्या संकट काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून तन-मन-धनाने लढा देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कोरोना योध्याचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या मध्ये पेण येथील रामेश्वर कन्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पेण तालुक्यातील दोन कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.

समाजसेवक व रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचीका व अहिल्या महिला मंडळाच्या अश्विनी गाडगीळ यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटात मुंबई-गोवा हायवे वरून गावाकडे निघालेल्या शेकडो वाटसरूंना राजू पिचीका यांनी स्वखर्चाने त्यांच्या गावी जाण्याकरिता वाहने उपलब्ध करून दिली. त्याच प्रमाणे पेण तहसील कार्यालयाला कोरोना रुग्णांची ने-आण करण्याकरिता रुग्णवाहिका दिली आहे. या व्यतिरिक्त कोरोना संकटात शेकडो गोरगरिबांना अन्नधान्य व इतर मदतीचे वाटप केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे. राजू पिचिका व अश्विनी गाडगीळ यांच्यावर पेण तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details