रायगड - कोरोनाचाचणी करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवले जात होते. त्यामुळे रुग्णांचा चाचणी अहवाल येण्यास वेळ लागत असे. मात्र, आता रायगडमधील रुग्णांची स्वॅब तपासणी जिल्ह्यातच होणार आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू तपासणी यंत्रणा आणि प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रायगडकरांना स्वॅब तपासणी अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
जिल्ह्यातच होणार कोरोनाबाधितांची स्वॅब तपासणी; जिल्हा रुग्णालयाला प्रयोगशाळा मंजूर - अलिबाग कोरोना अपडेट
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता स्वॅब तपासणी यंत्रणा आणि प्रयोगशाळा जिल्ह्यात व्हावी यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार जिल्ह्याला प्रयोगशाळा मंजूर झाली आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता स्वॅब तपासणी यंत्रणा आणि प्रयोगशाळा जिल्ह्यात व्हावी, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या मागणीनुसार अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात कोरोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. याबाबत शासनाने लेखी निर्णय मंजूर केला आहे. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व खासगी उपक्रमांच्या सीएसआर(कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तपासणी लॅबमुळे नागरिकांचे स्वॅब चाचण्यांचे अहवाल जिल्हा स्तरावरच वेळेत मिळणार आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा रूग्णालयात ही लॅब मंजूर व्हावी, यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून, यामुळे रायगडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.