रायगड - श्रीवर्धनमध्ये शुक्रवारी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आज दिवशी पोलादपूरमध्ये 63 वर्षीची महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेस मुंबई कस्तुरबा रुग्णालयात ठेवले असून उपचार सुरू आहेत. पनवेल आणि उरणमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असताना आता दक्षिण रायगडमध्ये देखील रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. यामुळे रायगडमध्ये धोका वाढला आहे. संचारबंदी लागू असताना देखील अनेक नागरिक मुंबईतून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या नागरिकांमुळे रायगडकरांची धास्ती वाढू लागली आहे.
पोलादपूर शहरात राहणाऱ्या या वृद्ध महिलेचा मुलगा, सून भांडूपमधून 30 मार्चला गावी आले होते. त्यानंतर वृद्ध महिलेस ताप, सर्दीची लक्षणे सुरू दिसून त्या आजारी पडल्या. त्यानंतर या महिलेस महाड मधील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात आले. याठिकाणी प्रकृती न सुधारल्याने संंबंधित महिलेस मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. या महिलेचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज आला असून या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना : श्रीवर्धननंतर पोलादपूरमध्ये आढळला 'पॉझिटिव्ह'; रायगडमध्ये संख्या वाढली - covid 19 in raigad
श्रीवर्धनमध्ये शुक्रवारी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आज दिवशी पोलादपूरमध्ये 63 वर्षीची महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेस मुंबई कस्तुरबा रुग्णालयात ठेवले असून उपचार सुरू आहेत.

श्रीवर्धन आणि पोलादपूर या दोन्ही रुग्णांचे 'मुंबई कनेक्शन' समोर येत असून लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून रायगडमध्ये दाखल झालेल्या नागरिकांमुळे कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोलादपूरमध्ये वास्तव्य करणारी ही महिला आजारपणावेळी महाडमध्ये डॉ.आदीत्य म्हामणकर यांच्या दवाखान्यात उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून संबंधित दवाखाना देखील सील करण्यात आलाय. यामुळे पोलादपूरसोबतच महाडमध्ये देखील या महिलेचा थेट संबध आल्याने भीतीचे वातावरण आहे. आता संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.