रायगड - जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावमुळे 15 जुलैपासून 26 जुलैच्या माध्यरात्रीपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लागू केले. अकरा दिवसांचे हे लॉकडाऊन 24 जुलैच्या मध्यरात्रीपासून दोन दिवस आधीच रद्द केले. 15 जुलै ते 24 जुलैदरम्यान जिल्ह्यात 4 हजार 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी आनंदाची बाब म्हणजे 3 हजार 516 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दहा दिवसांत 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पावणे चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 8 हजार 472 रुग्ण हे आतापर्यंत बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण 68 टक्के एवढे वाढले आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात रोज तीनशे ते चारशे कोरोनाबाधित रुग्ण वाढू लागले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी वाढू लागली होती. त्यानुसार जिल्ह्यात अकरा दिवसाचे लॉकडाऊन जिल्हाधिकारी यांनी लागू केले. असे असले तरी कोरोनाबाधित रुग्ण हे आढळत होते. मात्र, जमेची बाजू म्हणजे बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
रायगडमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले - raigad corona news
जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे 15 जुलैपासून 26 जुलैच्या माध्यरात्रीपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लागू केले. अकरा दिवसांचे हे लॉकडाऊन 24 जुलैच्या मध्यरात्रीपासून दोन दिवस आधीच रद्द केले. 15 जुलै ते 24 जुलैदरम्यान जिल्ह्यात 4 हजार 74 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी आनंदाची बाब म्हणजे 3 हजार 516 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात 15 जुलै ते 24 जुलै दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा हा चार हजार पार झाला असला तरी साडेतीन हजार रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. ही एक जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बारा हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून साडेआठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर सध्या पावणेचार हजार रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 334 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण 68 टक्के, रुग्ण पॉझिइव्ह होण्याचे प्रमाण 29 टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण हे फक्त 3 टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संकटाला धीराने सामोरे जाणे गरजेचे आहे.