रायगड -उरण तालुक्यातील करंजा हे गाव कोरोना हॉटस्पॉट आहे. शनिवारी येथील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि एटीएम सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
धक्कादायक..! कोरोना हॉटस्पॉट असलेल्या करंज्यात जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची निदर्शने - Karanja Curfew violation
उरण तालुक्यात 104 कोरोनाबाधित असून एकट्या करंजा गावात 101 रुग्ण आहेत. त्यामुळे हे गाव कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. असे असतानाही शनिवारी रात्री दीडशे ते दोनशे लोकांच्या जमावाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने केली. जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होत नसल्याने उपसमारीची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
![धक्कादायक..! कोरोना हॉटस्पॉट असलेल्या करंज्यात जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची निदर्शने Protests](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7232388-647-7232388-1589698865702.jpg)
उरण तालुक्यात 104 कोरोनाबाधित असून एकट्या करंजा गावात 101 रूग्ण आहेत. त्यामुळे हे गाव कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. कोणीही घराबाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, असे असतानाही शनिवारी रात्री दीडशे ते दोनशे लोकांच्या जमावाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने केली.
जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा होत नसल्याने उपसमारीची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी जमावबंदी आदेश झुगारून गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या प्रकारानंतर मात्र, आणखी काही जणांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.