महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी डॉक्टर, परिचारिका दोन महिने पगारापासून वंचित - doctor, nurse salary issu

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी कोट्यवधींचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. मात्र ज्याच्या जीवावर कोरोना रुग्णाच्या उचपचारची जबाबदारी आहे, अशा डॉक्टर, परिचारिका याच्या वेतनासाठी अनुदान देण्यासाठी चालढकलपणा शासन स्तरावर होत असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात कंत्राटी घेतलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील 17 डॉक्टर आणि 59 परिचारिकेचे दोन महिन्याचे वेतन अनुदान न आल्याने रखडले आहे.

doctor, nurse salary issu
doctor, nurse salary issu

By

Published : Jun 1, 2021, 6:58 PM IST

Updated : Jun 1, 2021, 7:05 PM IST

रायगड - कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी कोट्यवधींचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. मात्र ज्याच्या जीवावर कोरोना रुग्णाच्या उचपचारची जबाबदारी आहे, अशा डॉक्टर, परिचारिका याच्या वेतनासाठी अनुदान देण्यासाठी चालढकलपणा शासन स्तरावर होत असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात कंत्राटी घेतलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील 17 डॉक्टर आणि 59 परिचारिकेचे दोन महिन्याचे वेतन अनुदान न आल्याने रखडले आहे. तर कायमस्वरूपी असलेल्या डॉक्टर, परिचारिका याचे एक महिन्याचे वेतन थकले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे प्रशासकीय अधिकारी धामोडा यांनी म्हटले आहे.

कोरोना रुग्णावर उपचार करण्याची धुरा डॉक्टर-परिचारिकांवर -

कोरोना महामारी सुरू झाली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आणि त्याबाबतची उपाययोजना शासनाकडून करण्यास सुरुवात झाली. कोविड सेंटर, रुग्णालय, तपासणी प्रयोगशाळा, ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर या उपाययोजना केल्या गेल्या. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक दिवसरात्र कोरोना रुग्णालयात रुग्णावर उपचार करू लागले. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या आरोग्याची मुख्य जबाबदारी ही त्याठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक याच्याच खांद्यावर आहे.

कंत्राटी डॉक्टर, परिचारिका दोन महिने पगारापासून वंचित
कंत्राटी डॉक्टर, परिचारिका दोन महिन्यापासून पगाराविना करीत आहेत काम -
कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर डॉक्टर, परिचारिका यांची कमतरता जाणवू लागली. त्यामूळे महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी भरती करण्यात आली. 17 डॉक्टर आणि 59 परिचरिकाची भरती करण्यात आली. कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टर, परिचारिका हे आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. दिवस रात्र कायम स्वरूपी डॉक्टर, परिचारिका सोबत कंत्राटी डॉक्टर, परिचारिका त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मात्र एप्रिल, मे महिन्याचा असा दोन महिन्याचा पगार या कंत्राटी डॉक्टर, परिचारिका यांना मिळालेला नाही. त्यामुळे दोन महिन्यापासून पगारापासून वंचित राहिले असले तरी अजूनही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित वेतनाचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे अनुदान प्राप्त पण कंत्राटींचे अजून प्रतीक्षेत -
जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी 35 डॉक्टर तर 28 परिचारिका कार्यरत आहेत. कायमस्वरूपी डॉक्टर आणि परिचारिका व इतर कर्मचारी याचेही एक महिन्याचे वेतन अनुदान प्राप्त न झाल्याने थकले होते. दीड कोटी अनुदान हे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे 31 मे रोजी प्राप्त झाले असून तीन ते चार दिवसात कायमस्वरूपी डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी याचा पगार खात्यात जमा होईल, असे प्रशासकीय अधिकारी धामोडे यांनी माहिती दिली आहे. तर कंत्राटी असलेल्या डॉक्टर आणि परिचारिका यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे धामोडे यांनी म्हटले आहे. मात्र हे अनुदान कधी येणार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नाही. त्यामुळे कंत्राटी डॉक्टर, परिचारिका यांना अनुदान प्राप्त होईपर्यत वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे.
Last Updated : Jun 1, 2021, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details