रायगड - जगभरात पेट्रोल, डिझेलच्या बॅरेलचे भाव कमी झालेले असताना देशात इंधनाचे दर रोज वाढत आहेत. मात्र, भाजप सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रायगड जिल्हा काँग्रेसने केला आहे. इंधनाच्या दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसनेआज अलिबाग येथे आंदोलन केले.
रायगड : पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना मागण्याचे निवेदन जिल्हा दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
काँग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना मागण्याचे निवेदन जिल्हा दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अलिबाग शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांना प्रतिक्रियाही जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी तालुकाप्रमुख योगेश मगर, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड प्रथमेश पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष अॅड श्रद्धा ठाकूर, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅड कौस्तुभ पुनकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, टाळेबंदीत सुमारे 84 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, जून महिन्यात रोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे माल वाहतूकदार संघटनेनेही संघटनेचा संप पुकारण्याचा इशारा दिला होता. काँग्रसने पेट्रोल व डिझेलविरोधात देशभर आंदोलन सुरू केले आहे.