रायगड - देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हाच ही लाट थोपविण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी व काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काही सूचना केल्या होत्या. त्याची भाजपच्या नेत्यांनी थट्टा केली. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर महिन्यातच दिला होता. पण, पंततप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचेच ऐकले नाही. ते बहिणजी-बहिणजी करत निवडणूक प्रचार करत राहीले. मोदींच्या या अहंकारामुळेच देश सध्या स्मशान बनला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
अलिबाग यथे बॅ.ए.आर.अंतुले भुवन येथे शनिवारी (दि. 22 मे) आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. कोरोना भारतात वाढण्यास पंतप्रधानांचा अहंकारी पणा कारणीभूत आहे. विरोधकांच्या सूचनांकडे दर्लक्ष करणे, विरोधकांनी केलेल्या सुचनांची थट्टा करणे केंद्र सरकारने थांबवले पाहिजे. विरोधकांना सोबत घेऊन देश वाचविण्याचे काम केले पाहिजे. कोरोनाच्या माहामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी विरोधक व तज्ज्ञांना सोबत घेऊन एक मोहीम आखायाला हवी, असे नाना पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनचा अभ्यास करावा