महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजबिल वसूली मोहीम; पेण तालुक्यातील 2 हजार 100 विज ग्राहकांची बत्ती गुल - वीजबिल वसूली मोहीम

महावितरण विभागाचे कर्मचाऱ्यांनी वीजबिल वसूल मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी घरगुती आणि व्यवसायीक इतर थकीत बिल वीजपुरवठा खंडीत होण्यापूर्वीच तात्काळ भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बत्ती गुल
बत्ती गुल

By

Published : Apr 3, 2021, 7:20 PM IST

पेण (रायगड) -महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकीत वीजबिलांविरोधात मोहिम आखली असून या मोहिमेस पेण तालुक्यातील नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पेण तालुक्यातील 58 हजार 221 वीज ग्राहक असून त्यातील मागील सहा महिन्यातील 20 हजारच्या वर वीजबिल वेळेवर न भरलेल्या ग्राहकांची संख्या आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 10 कोटी 32 लाख 11 हजार 171 थकीत विजबिलांची वसुली झाली असून अजून 8 कोटी 2 लाख 44 हजार 892 रुपये वसुली करायची शिल्लक आहे. तालुक्यातील 2 हजार 100 घरगुती ग्राहकांचे व 395 व्यापारी ग्राहकांचे वीज बिल कनेक्शन बिल न भरल्यामुळे कट करण्यात आले असल्याची माहिती पेण महावितरणकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये

वीजबिल वसूली सुरू

पेण तालुक्यातील वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक वीजबिलापोटी सुमारे 18 कोटी 34 लाखांच्या थकीत रकमेपैकीृ 10 कोटी 32 लाख 11 हजार 171 रुपयांची वसुली करण्यात पेण महावितरणला यश आले आहे. तर वीजबिल चोरी करणारे 75 प्रकरणे उघडकीस आली असून त्यांच्याकडून 17 लाख 77 हजार 600 रुपयांची कायदेशीर वसुली करण्यात आली आहे.

वीजपुरवठा खंडीत होण्यापूर्वी वीजबिल भरा
कोरोनाच्या काळातील पेण तालुक्यांमध्ये महावितरण विभागाची सुमारे 18 कोटी 34 लाखांची वीजबिले थकीत आहेत. यामध्ये शहरी-ग्रामीण ग्रामपंचायतच्या दिवाबत्तीचे घरगुती आणि इतर वीजबिलांचे थकीत वसुली करण्याचे आदेश महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार महावितरण विभागाचे कर्मचाऱ्यांनी वीजबिल वसूल मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी घरगुती आणि व्यवसायीक इतर थकीत बिल वीजपुरवठा खंडीत होण्यापूर्वीच तात्काळ भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा -मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेचा लोकल प्रवास? फोन उचलायला ठेवला होता एक माणूस

ABOUT THE AUTHOR

...view details