पनवेल- भाजप नगरसेवक अजय बहिरा यांना लॉकडाऊनमध्ये आयोजित केलेली 'बर्थ-डे पार्टी' चांगलीच भोवली आहे. 11 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून अजय बहिरांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या पनवेलच्या भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल - पनवेलच्या भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल
भाजप नगरसेवक अजय बहिरा यांना लॉकडाऊनमध्ये आयोजित केलेली 'बर्थ-डे पार्टी' चांगलीच भोवली आहे. 11 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून अजय बहिरांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री तक्का येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अजय बहिरा यांनी कायदा पायदळी तुडवून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर जंगी पार्टीचे आयोजन करून मित्रांनाही आमंत्रण दिले होते. या पार्टीसाठी खास वीस किलो कोळंबीचा जेवणात बेत केला होता आणि ओली पार्टीही केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असताना मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या पनवेलच्या अजय बहिरा या नगरसेवकांवर रात्री उशिरा पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या नगरसेवकांसह त्यांचे दहा साथीदार मिळून एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल शहर पोलिसांनी ही कारवाई केली.