रायगड - कोरोनाची ही लढाई आपण सर्वांच्या सहकार्याने जिंकू, पुन्हा जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येईल. प्रत्येकाने संवेदनशीलता दाखवा, कोरोनाबाधितांना बहिष्कृत करू नका. पुढील काळात शहरातील दुरावा कमी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला.
रायगड : कोरोनाची लढाई आपण नक्कीच जिंकू - जिल्हाधिकारी - रायगड कोरोना घडामोडी
महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान आणि आरोग्य शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही रक्तदान केले.
गणपती सणाच्या निमित्ताने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयामार्फत आज भाग्यलक्ष्मी हॉल याठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक, तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पत्रकार यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार केला. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात त्यांनी कोरोनाची लढाई आपण जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.
महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान आणि आरोग्य शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीही रक्तदान केले. महसूल दिनानिमित्त रॅपिड अँटीजेन तपासणीही यानिमित्ताने करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, प्रांताधिकारी शारदा पोवार, अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ, मुरुड तहसीलदार श्री. गोसावी उपस्थित होते.