महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थळमध्ये केली नुकसानीची पाहणी - पालकमंत्री अदिती तटकरे बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

cm-uddhav-thackeray-surveyed-extent-of-damage-caused-by-cyclone-nisarga-at-thal-in-raigad-district
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली थळमध्ये नुकसानीची पाहणी

By

Published : Jun 5, 2020, 3:18 PM IST

रायगड- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. थळ येथील कालभैरव मंदिराजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कारवा थांबला. त्यानंतर गाडीतून उतरुन मुत्र्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली थळमध्ये नुकसानीची पाहणी

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी रवाना झाले. भाऊचा धक्का येथून मुख्यमंत्री हे रोरो बोटसेवेतून मांडवा येथे आले. त्यानंतर वाहनाने अलिबागकडे रवाना झाले. त्यानंतर थळ येथील पाहणी दौरा करून बैठकीसाठी रवाना झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details