रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आपल्या जीवाची राख रांगोळी करणारे मावळे होते, म्हणून स्वराज्य निर्माण झाले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांचा इतिहासही जिवंत ठेवणे महत्वाचे आहे. आजचा दिवस हा माझा तीर्थक्षेत्राचा पवित्र दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळासाठी आणि स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.
सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांची ३५० वी पुण्यतिथी उमरठ येथे साजरी झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणात आपले मत व्यक्त केले. उमरठ येथे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते समाधीस्थळाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी समितीतर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करून तलवार आणि नरवीर पगडी देण्यात आली.
हेही वाचा -नरवीर तानाजी मालुसरेंचा 350 वी पुण्यतिथी सोहळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राहणार उपस्थिती