मुंबई : रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याला भेट देणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळामुळे प्रशासन हे पंचनामे व इतर मदत कार्यात व्यस्त आहे. आपदग्रस्तांना अनुदान वाटप, साहित्य वाटप यापूर्वीच सुरू झाले आहे. हे मदत कार्य अधिक वेगाने होणे महत्त्वाचे असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार होते. नियोजीत दौऱ्यानुसार सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोचून चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करणार होते. त्यानंतर बोर्ली येथील मुरुडमध्ये नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप, तसेच पत्रकार परिषद घेणार होते.