महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वराज्याचा महायज्ञ ..! रायगड किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार - मुख्यमंत्री

रायगड किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत व पुरातत्व विभागाच्या मदतीने रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी केली रायगडाची पाहणी

By

Published : Jun 2, 2019, 6:28 PM IST

रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत व पुरातत्व विभागाच्या मदतीने रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी रायगड किल्ले संवर्धन कामाची आज पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तसेच पुरातत्व विभागाकडूनही काम चांगले होत आहे. पुरातत्व विभागामार्फत किल्ल्यावर ३०० वाड्याचा शोध लागला असून २ वाड्याचे काम सध्या सुरू आहे. पावसाळ्यानंतर इतर वाड्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातूनही चांगले काम होत आहे. किल्ल्याच्या मूळ पायऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. पूर्वीच्या ज्या खडकाने किल्ल्याचे बांधकाम केले आहे, तोच खडक बांधकामासाठी वापरला जात आहे. तर चुनखळीचा वापरही केला जात आहे. जुन्या काळात जसे बांधकाम होते तसेच करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

रायगड किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार - मुख्यमंत्री

रायगडच्या पायथ्याशी काम सुरू झाले आहे. त्यासाटी ५० एकर जमीन अधिग्रहण केली असून, अजून २० एकर जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवप्रेमीच्या मनातील असलेला रायगड किल्ला पुन्हा मूळ स्वरूपात करण्याचा आमचा स्वराज्याचा महायज्ञ असल्याचे फडणवीस म्हणाले.

किल्ला संवर्धन अंतर्गत किल्ल्यावर उत्खनन व डागडुजी कामे सुरू आहेत. यासाठी राज्य शासनाने ६०० कोटींचा आराखडा रायगड विकास प्राधिकरण माध्यमातून मंजूर केला आहे. त्यातील ६० कोटी रुपये संवर्धन कामासाठी देण्यात आले आहेत.

सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या लवाजम्यासह रोपवेने किल्ल्यावर आले. यावेळी किल्ल्याच्या पूर्वेकडील भागाची, हत्तीखाना, हत्ती तलाव, उत्खनन याची पाहणी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीस्थळ, राजसदर, होळीचा माळ याठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. हत्तीखाना येथे उत्खननात सापडलेल्या साहित्याची यावेळी त्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या अचानक लागलेल्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

यावेळी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अनिकेत तटकरे, रघुजी राजे आंग्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details