रायगड - महाराष्ट्राच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आज जीर्ण झाले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संस्था, आणि युवा कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झटत आहेत. त्याच प्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान या गडकोटांचे संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थेचे कामही उल्लेखनीय आहे. प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उंदेरी किल्ल्यावरही संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे उंदेरी किल्ल्याने मोकळा श्वास घेतला आहे. या मोहिमेत लहान बालकांपासून ते तरुण, वयोवृद्ध यांसर्वांच्या सहभागातून या किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.
उंदेरी किल्ल्याने घेतला मोकळा श्वास; सह्याद्री प्रतिष्ठानने राबवली स्वच्छता मोहीम.... - खांदेरी किल्ला
उंदेरी किल्ल्याची तटबंदी अनेक झाडाझुडपाने वेढली आहे. किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढले होते. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीने या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आता या किल्ल्याने मोकळा श्वास घेतला आहे.
उंदेरी किल्ल्याने घेतला मोकळा श्वास; सह्याद्री प्रतिष्ठानने राबवली स्वच्छता मोहीम....