रायगड -देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी खाकी वर्दी विरोधात काळे कोट अर्थात पोलिसांविरोधात वकिल असा संघर्ष पहायला मिळाला. त्यापाठोपाठ आता पनवेलमध्येही वकील विरुद्ध प्रांताधिकारी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या कारभाराबाबत नाराज झालेल्या, बार असोसिएशनच्या वकिलांनी नुकताच प्रांताधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता.
हेही वाचा... पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पवारांनी केले टि्वट, म्हणाले...'शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींशी केली चर्चा'
प्रक्रियेनुसार सर्वात आधी तहसीलदार आणि नंतर प्रांताधिकारी यांच्याकडे महसुली दावे चालतात. यातील वादी प्रतिवादी त्यांच्यासमोर युक्तिवाद करतात. तहसील कार्यालयात निकाल लागल्यानंतर समाधानकारक निकाल मिळाला नाही, तर प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केले जाते. ते याप्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देतात. एक प्रकारे येथे न्यायालयीन प्रक्रिया चालते. प्रांताधिकारी न्यायदंडाधिकारी असतात. त्यांच्याकडे अनेक महसुली दाव्यांच्या प्रकरणाची सुनावणी होते. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या कार्यपद्धतीवर मात्र पनवेल तालुका वकील संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.