रायगड- प्राचार्य पदाच्या वादातून चर्चेत असलेल्या महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आज (दि. 26 डिसें) सकाळी राडा झाला. येथील शिक्षकांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये दांडके, विटा, दगडाचा सर्रास वापर करण्यात आला.
महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकांच्या दोन गटात हाणामारी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज
प्राचार्य पदाच्या वादातून चर्चेत असलेल्या महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये आज (दि. 26 डिसें) सकाळी राडा झाला.

दोन गटात झालेल्या हाणामारीत 6 जण जखमी झाले आहेत. प्राचार्य सुरेश आठवले, धनाजी गुरव, महेंद्र घारे, अरविंद साळवी, विठ्ठल गायकवाड, संजय हाटे हे जखमी झाले आहेत. यात महेंद्र घारे हे गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. दरम्यान, कॉलेजमध्ये खुर्च्या, दरवाजे, फलक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिक्षकांची हाणामारी रायगडमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा - रायगड जिल्हा परिषद : अध्यक्ष, सभापतींच्या कार्यालयाच्या दुरुस्तीवर जनतेच्या करोडे रुपयांचा चुराडा