नवी मुंबई:नवी मुंबईत सिडकोच्या आरक्षित भूखंडांना (Reserved Plots of CIDCO) करोडो रुपयांचा भाव मिळत आहे. सिडकोच्या भुखंडांना बिल्डर्सकडुन चांगलीचं पसंती मिळताना दिसत आहे. सानपाडा येथील भुखंडास प्रती चौरस मीटर साडे पाच लाख रुपयांचा दर, तर नेरूळमधील भुखंडास प्रती चौरस मीटर 4 लाख 80 हजारांचा विक्रमी दर मिळाला आहे. रियल इस्टेटच्या बाजारात (Real Estate) हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बिल्डर्ससह नागरिकांची पसंती असणाऱ्या नेरूळ आणि सानपाडा येथील भुखंडांचे दर गगनाला भिडल्याचं चित्र आहे.
CIDCO: सिडकोची भूखंड विक्रीतून कोटींची कमाई; सानपाडा-नेरूळ स्थित भूखंडांना विक्रमी दर - ई लिलाव
नवी मुंबईत सिडकोच्या (CIDCO) आरक्षित भूखंडांना करोडो रुपयांचा भाव मिळत आहे. रियल इस्टेटच्या (Real Estate) बाजारात हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नागरिकांची पसंती असणाऱ्या नेरूळ आणि सानपाडा येथील भुखंडांचे दर गगनाला भिडल्याचं चित्र आहे. जाणुन घेऊयात सविस्तर...

नेरूळ-सानपाडा बिल्डर्सच्या पसंतीस-या परिस्थीतीचं मुख्य कारण म्हणजे या भूखंडांना मिळणारी लोकांची पसंती आणि बिल्डर्सना मिळणारा प्रतिसाद. सिडकोच्या योजनेअंतर्गत विविध भागातील 30 भूखंडांची विक्री लिलावांच्या माध्यमातून सुरू आहे. सानपाडा आणि नेरूळ मधील भूखंडांना मिळालेल्या भावाने विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील दोन वर्षांपासून सिडकोने भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. त्यानुसार, सिडकोने 30 योजना राबविल्या आहेत. सोमवारी 31व्या योजनेअंतर्गत ई-लिलाव (E Auction) पार पडले.
सिडकोची कोटींची कमाई- सिडकोने भुखंड विक्रीतुन 1300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये जाहीर केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे (Integrated Development Control Regulations) बिल्डर्सना नंतर वाढीव रक्कम मिळणार असल्याने नवी मुंबईतील भुखंडांना जास्त दर मिळत असल्याचे नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशनचे हरिष छेडा यांनी सांगितले.