महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vadkhal Gram Panchayat : महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राज्यासह केंद्र सरकार कटिबद्ध - चित्रा वाघ

ग्रुप ग्राम पंचायत वडखळ यांच्या वतीने ग्राम निधी मार्फत महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे शिंदे फडणवीस सरकार महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध असतील, याची घोषणा चित्रा वाघ यांनी बोलताना केली.

Chitra Wagh News
वडखळ ग्राम पंचायतीने महिलांसाठी घेतला कार्यक्रम

By

Published : Jun 16, 2023, 6:25 PM IST

कार्यक्रमात बोलताना चित्रा वाघ

रायगड: ग्रुप ग्रामपंचायत यांच्यावतीने ग्राम निधी मार्फत महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप अध्यक्षा चित्रा वाघ यांनी वडखळ ग्राम पंचायतीने महिलांसाठी घेतलेल्या या कार्यक्रमाची स्तुती करत, महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केंद्रासह राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, वडखळ सरपंच राजेश मोकल, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंठे, जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष तन्वी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पुजा मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमांचे केले आयोजन: 15 टक्के मागासवर्गीय निधीमधून साहित्य वाटप, 5 टक्के अपंग निधी अर्थसाहाय्य वाटप, इंडिया पोस्ट पेमेंट बँक व टाटा ए.आय.जी इन्श्युरन्स पॉलिसी वाटप, 10 टक्के महिला बालकल्याण मधून हळदीकुंकू कार्यक्रम, तसेच पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


महिलांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वडखळ सरपंचांनी अपंग, मागास, महीला अशा समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या सोबत घेऊन चालण्याचे काम सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढावची घोषणा केली, ती अमलात देखील आणली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे शिंदे फडणवीस सरकार महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कटिबद्ध असतील, याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. तसेच सरपंच राजेश मोकल यांच्यावर कौतुकाची थाप टाकताना शासनाचा सेवक हा ग्रामसेवक असतो, पण राजेश मोकल एवढे चांगले काम करत आहेत. तेच खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांचे सेवक झाले आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.


ही आहे पहिली ग्राम पंचायत : यावेळी आपल्या भाषणातून बोलताना सरपंच राजेश मोकल यांनी सांगितले की, वर्षभरात ग्राम पंचायतीच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवले जातात. तसेच आतापर्यंत राबविलेल्या सर्वच योजनांचीही माहिती दिली. वडखळ ग्रामपंचायत ही राज्यातील अशी पहिली ग्राम पंचायत असेल, की त्या ग्राम पंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांची दहा लाखांची पॉलिसी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Chitra Wagh Advise लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याऐवजी रितसर लग्न करा चित्रा वाघ यांचा सल्ला
  2. Chitra Wagh Criticizes Sanjay Raut सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा चित्रा वाघ यांचे ताशेरे
  3. Chitra Wagh News चित्रा वाघ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेड आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details