रायगड -दरड कोसळून बेघर झालेल्या अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी येथील आदिवासी कुटुंबांना चिंतामणराव केळकर विद्यालयातर्फे गृहपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली आहे. शनिवारी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
रायगडच्या वेलटवाडीतील दरडग्रस्तांना चिंतामणराव केळकर विद्यालयाचा मदतीचा हात - tribals at velatwadi in raigad
दरड कोसळून बेघर झालेल्या अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी येथील आदिवासी कुटुंबांना चिंतामणराव केळकर विद्यालयातर्फे गृहपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली आहे. शनिवारी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी येथे दरड कोसळली होती. त्यामुळे येथील आदिवासींच्या 40 घरांची पडझड झाली होती. त्यानंतर ही कुटुंब गावातील शाळेत वास्तव्याला आहेत. त्यांना गृहपयोगी वस्तूंसाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात आले होते. त्याला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे संचालक आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
जमा झालेल्या निधीतून दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या. 17 ऑगस्ट रोजी वेलटवडी येथे जाऊन चिंतामणराव गृहपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. दत्ताजीराव खानवीलकर एज्यूकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे, चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भावना केळकर, मुख्याध्यापिका सौ. सीमा पाटील, सौ. ज्याती काटले, सौ. सरोज मळेकर, सुचेता खरोटे तसेच अनंत गोधळी, योगेश मगर आदी उपस्थित होते.