महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विसरू नका ! मतदानासाठी महाडमधील औषध विक्रेत्याचा अनोखा फंडा - election

महाड येथील एम. के. डिस्ट्रीब्यूटर या होलसेल औषध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने आपल्या प्रत्येक पावतीवर 'मतदान करण्यास विसरू नका' असा संदेश देत २३ एप्रिल या मतदान दिवसाची आठवण करून देत आहेत.

'मतदान करण्यास विसरू नका' असा संदेश प्रत्येक पावतीवर दिला आहे.

By

Published : Apr 3, 2019, 2:42 PM IST

रायगड -मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासन तसेच निवडणूक आयोग वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे. जाहिरातबाजी केली जात आहे. शासनाच्या या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम रायगड जिल्ह्यातील महाड येथील एम. के. डिस्ट्रीब्यूटर या होलसेल औषध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने केले आहे. ते आपल्या प्रत्येक पावतीवर 'मतदान करण्यास विसरू नका' असा संदेश देत २३ एप्रिल या मतदान दिवसाची आठवण करून देत आहेत.

एम. के. डिस्ट्रीब्यूटर या होलसेल औषध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने आपल्या प्रत्येक पावतीवर 'मतदान करण्यास विसरू नका' असा संदेश दिला आहे.

एम.के. डिस्ट्रीब्यूटर यांच्याकडे विविध औषध कंपन्यांच्या होलसेल डिलरशिप आहे. प्रतिदिन त्यांच्याकडुन दोनशेपेक्षा अधिक औषध विक्रेत्यांना मालाचा पुरवठा केला जातो. या ग्राहकांना मतदानाची तारीख आणि मतदान करण्याची आठवण ते करुन देत आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

मतदान वाढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच केमिस्ट डिस्ट्रीब्यूटर्स हे स्वतःहून मतदान करा असा संदेश देत आहेत. त्यामुळे मतदारांनीही मोठ्या संख्येने मतदानास बाहेर पडणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details