रायगड -मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत रसायन घेऊन जाणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. या टँकरमधून रसायन रस्त्यावर पडले असून ते नष्ट करण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रसायन घेऊन जाणारा ट्रक कर्नाळा खिंडीत उलटला; जीवितहानी नाही
टँकर रसायन कॅप्सूल घेऊन मुंबईकडे जात होता. कर्नाळा घाटाजवळ येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला
रसायन घेऊन जाणारा ट्रक कर्नाळा खिंडीत उलटला
टँकर रसायन कॅप्सूल घेऊन मुंबईकडे जात होता. कर्नाळा घाटाजवळ येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. मात्र, टँकरमधून रसायन बाहेर पडले आहे.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून रस्त्यावर सांडलेले रसायन नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे.