रायगड - रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने आणि त्यात हलका पाऊस असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसाळी सहलीकरता खंडाळा घाटात मोठी गर्दी करत आहेत. खालापूर-खोपोली येथे प्रशासनाने चेक पोस्ट उभारले आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांना थांबवून त्यांची अँटिजेन टेस्ट करून निकाल निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी पाठवले जाते. घरी पाठवत असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला असला, तरी प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शासकीय नियम कायम आहेत.
पर्यटकांना थांबवण्यासाठी प्रशासनाने उभारले चेक पोस्ट
खालापूर-खोपोली पर्यटक परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चेक करण्यासाठी येथील प्रशासनाने चेक पोस्ट उभारले आहे. यामुळे येथे पर्यटकांना थांबवून त्यांची अँटिजेन टेस्ट केली जात आहे.
खंडाळा घाटात पर्यटकांनी मोठी गर्दी
शनिवारी खंडाळा घाटात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर, पर्यटकांच्या हौशी व उथळपणामुळे ऐन लॉकडाऊन काळात नियमांचा भंग झाला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळपासून प्रशासन सतर्क झाले होते. खालापूर व खोपोली येथे प्रशासनाच्यावतीने चेक पोस्ट उभारण्यात आले होते. रविवार असल्याने त्यात हलका पाऊसदेखील होता. त्यामुळे अनेक पर्यटक हे पावसाळी सहलीकरता घराबाहेर पडले होते. दरम्यान, चेकपोस्ट येथे त्यांना थांबवण्यात आले. याठिकाणी त्यांची चौकशी करून अँटिजेन चाचणी देखील करण्यात आली. यामध्ये टेस्ट निगेटिव्ह अल्यावर घरी आणि पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटलला दाखल करण्यात येत आहे. या प्रयोगामुळे पर्यटकांत भितीचे वातावरण असल्याने, बरेच लोक इकडे फिरकतही नाहीत. ही कारवाईत खालापूर तहसीलदार कार्यालय, खालापूर उपविभागीय पोलीस कार्यालय, खालापूर, खोपोली पोलीस स्टेशन, आणि तालुका आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने चालू आहे.