रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दोषी असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांवर रायगड पोलिसांनी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायालयात आज (शुक्रवारी) दोषारोप पत्र दाखल केले. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येस संधी दिल्याचा आरोप या दोषारोप पत्रात दाखल केला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामींसह नितेश सरडा, दिरोज शेखच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अर्णबसह दोघांवर आहेत आरोप -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पुन्हा सुरू करण्याबाबत अनव्य नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर या केसचा तपास हा सीबीआयकडे देण्यात आला होता. आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारताचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा, फिरोज शेख यांच्यावर आरोप आहे. त्यानुसार रायगड पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. त्यानंतर अर्णब, नितेश आणि फिरोज याना जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने अर्णबसह दोघांनाही अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामींवर दोषारोप पत्र दाखल - अर्णब गोस्वामींवर दोषारोप पत्र दाखल
अलिबाग न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -चौकशीसाठी 14 दिवसांचा वेळ द्या - प्रताप सरनाईक यांची ईडीकडे मागणी
306, 109 अंतर्गत आरोप -
रायगड पोलिसांनी आज जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्णबसह दोघांवर दोषारोप पत्र दाखल केले आहे. यामध्ये 306 आणि 109 कलमांतर्गत दोषरोप पत्र दखल केले आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि आत्महत्येस साधी देणे हे दोन आरोप तिघांवर ठेवले आहेत. या प्रकरणात 65 साक्षीदार आहेत, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.
5 डिसेंबरला होणार पुनर्विचार याचिकेवर सुनावणी -
रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आणि नितेश, फिरोज याच्या जामिनावर जिल्हा सत्र न्यायालयात उद्या शनिवारी (5 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.