नवी मुंबई - गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने आरोपींना नोकरीसाठी पासपोर्ट मिळण्यात अडचण येत होती. यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी विनंती करणाऱ्या तरुणांवर चक्क तक्रारदारांनीच गुंडांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.
खटला मागे घेण्यासाठी विनंती करणाऱ्या तरुणांवर तक्रारदाराच्या गुंडांचा हल्ला सीबीडी बेलापूरमधील शहाबाज गावात राहणारे शब्बीर पटेल (२७), माहीर अहमद खान (२८) या दोघांसह वहाब कादीर खान तसेच सुफियाना युसूफ धुरी या चौघांविरोधात गुन्हा दाखल असून, त्याची सुनावणी सीबीडी न्यायालयात सुरू होती. उलवे येथील कोंबडभुजेमध्ये राहणारे अनिकेत भगत आणि स्वप्नील म्हात्रे या दोघांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यामुळे मोबीन खान व वहाब खान या दोघांना परदेशात नोकरीनिमित्त जाण्यासाठी पासपोर्ट मिळण्यास अडचणी येत होत्या.
हेही वाचा राजकीय मतभेदातून सामाजिक कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला; लातूरमधील घटना
सीबीडीतील न्यायालयात सुनावणी असल्याने यासीन पटेल व त्याचे अन्य तीन साथीदार सीबीडी येथील न्यायालयात गेले. यावेळी तक्रारदार म्हणून अनिकेत भगत हा देखील गेला होता. यासीन पटेल याने मोबीन व वहाब खान या दोघांना नोकरीसाठी परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट मिळण्यास अडचण येत असल्याने खटला मागे घेण्याची विनंती केली. याच कारणावरून अनिकेत आणि यासीन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. व त्याचे रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले.
हेही वाचा पनवेल महापालिकेच्या सुपरवायझरवर कामगांराचा चाकू हल्ला
हा राग तक्रारदार अनिकेत आणि स्वप्नील या दोघांनी डोक्यात ठेऊन उलवेमधील आणखी 15 ते 20 गुंडांना घेऊन रात्री साडे दहाच्या सुमारास सीबीडीतल्या शहाबाज गावात शिरले. व यानंतर त्यांनी शब्बीर पटेल व माहीर खान या दोघांवर बॅट, स्टम्प आणि रॉडच्या साहाय्याने हल्ला केला. परिसरातील नागरिक जमा झाल्याने सर्व हल्लेखोर पळून गेले.
मात्र, या हल्ल्यात यासीन आणि मिहीर हे दोघे जबर जखमी झाले असून, त्यांना महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी आरोपी अनिकेत भगत आणि स्वप्नील म्हात्रे या दोघांसह १२ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.