रायगड- रेवस समुद्रातून कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज बुडाल्याची घटना सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील नऊ जणांना दुसऱ्या बोटीतून सुखरूप धरमतर पोर्टवर आणण्यात आले.
कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज रेवस समुद्रात बुडाले; जीवितहानी नाही - रेवस समुद्रात बुडाले
मुंबईहून कोळसा नेण्यासाठी धरमतर पोर्टवर मालवाहू बार्ज येत होते. त्यावेळी तीन नंबर बोयाजवळ बार्ज आल्यानंतर इंजिनमध्ये पाणी गेल्याने ते बुडू लागले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबईहून कोळसा नेण्यासाठी धरमतर पोर्टवर मालवाहू बार्ज येत होते. त्यावेळी तीन नंबर बोयाजवळ बार्ज आल्यानंतर इंजिनमध्ये पाणी गेल्याने ते बुडू लागले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बार्जवर कर्मचारी होते. त्यांना दुसऱ्या बोटीने सुखरूप बाहेर काढले असून धरमतर पोर्टवर आणण्यात आले.
या बार्जवर एकूण किती कर्मचारी होते याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. एमएमबी अधिकारी आशिष मानकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार नऊ जणांना सुखरूप घटनास्थळी पोहचवले असल्याचे सांगितले जात आहे, तर इंजिनमध्ये पाणी घुसल्याने बार्ज बुडल्याची प्राथमिक माहिती आहे.