खालापूर (रायगड) - मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील जुन्या अमृतांजन ब्रीजवरून दत्तवाडी येथील सुमारे 150 फूट खोल दरीत कार कोसळली. यात गाडीत चालक, पत्नी आणि दोन लहान मुले अडकली होती. मात्र, सुदैवाने सर्वांना सुखरुप वाचवण्यात बोरघाट पोलिसांना यश आले आहे.
या घटनेची माहिती अफकोन कंपनीतील कामगारांनी बोरघाट पोलिसांनी दिल्यानंतर बोरघाट पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत शोधमोहीम चालू केली, त्या गाडीचा फोटो दिसत नसल्यामुळे कार शोधण्यात अडथळा येत होता. नंतर गाडीच्या लाइट टॉवरच्या दिशेने शोध घेतला असता गाडी बॅटरी हिलच्या जवळ दत्तवाडी येथील दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बोरघाट पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होत गाडीत अडकलेले मंगल रणविजयसिंग चौहान यांना बाहेर काढले. मंगल रणविजयसिंग चौहान हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ एमजीएम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर त्यांची पत्नी व दोन लहान मुले यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर 150 फूट खोल दरीत कार कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे
अमृतांजन ब्रीजवरून दत्तवाडी येथील सुमारे 150 फूट खोल दरीत कार कोसळली. यात गाडीत चालक, पत्नी आणि दोन लहान मुले अडकली होती. मात्र, सुदैवाने सर्वांना सुखरुप वाचवण्यात बोरघाट पोलिसांना यश आले आहे.
![मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर 150 फूट खोल दरीत कार कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही दरीत कोसळलेली कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11653424-476-11653424-1620224738887.jpg)
दरीत कोसळलेली कार