रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या अर्टिगा कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली असून कोणतीही जिवीत हानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही. बर्निग कार अपघाताची ही महिन्याभरातील चौथी घटना आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर बर्निग कारचा थरार, प्रवासी बचावला
मुंबई-गोवा महामार्गावर कारने अचानक पेट घेतला आणि जागीच कार जळून खाक झाली.
शंकर जाधव (६०) हे कोकणातून मुंबईकडे अर्टिगा कारने एकटे येण्यास निघाले होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास जाधव यांची कार पेण जवळील हमरापूर पुलावर असताना कारने अचानक पेट घेतला. कारने पेट घेताच जाधव यांनी प्रसंगावधान दाखवून कारच्या बाहेर पडले. त्यामुळे जाधव हे या अपघातात बचावले.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर यांच्या सतर्कतेमुळे वाहतूक पोलीस आणि पेण पोलीस, फायर ब्रिगेड टीमने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. या कारमुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.