महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर पुन्हा बर्निंग कारचा थरार, प्रवासी सुखरूप

मुंबई-पुणे महामार्गावर पुन्हा बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील जळालेली कार

By

Published : May 8, 2019, 12:25 PM IST

रायगड- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी धावत्या विंटो कारने अचानक पेट घेतला. ही कार पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, गाडी जळून खाक झाली आहे.

गेल्या पंधरा दिवसातील महामार्गावर हा तिसरा बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. विंटो कार चालक हा सकाळी प्रवाशांना घेऊन पुणे येथून मुंबईकडे येण्यास निघाला होता. पनवेल जवळ कार आली असता अचानक कारने पेट घेतला. कार पेटताच चालकाने प्रसंगावधान दाखवून कार बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारला आग कशाने लागली? याचे कारण कळू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details