रायगड - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात झाला. घाटातील शिंगरोबा मंदिराजवळ बस उलटल्याने 8 प्रवासी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर, किरकोळ जखमींवर खोपोलीच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात बसला अपघात; 8 प्रवासी जखमी - मुंबई-पुणे महामार्ग अपघात न्यूज
रायगडमध्ये शनिवार हा अपघात वार ठरला आहे. आज सकाळी दोन अपघात झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ बस उलटल्याने 8 प्रवासी जखमी झाले.
![मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात बसला अपघात; 8 प्रवासी जखमी Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9930777-thumbnail-3x2-rai.jpg)
अपघात
अपघात झालेली बस पिंपरी-चिंचवड येथून अलिबागला निघाली होती. बसमध्ये 17 प्रवासी होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही अपघात झाला होता. त्यात भरधाव कारने ट्रकला दिलेल्या धडकेत कारमधील तिघेजण जखमी झाले. जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले होते.