रायगड- गणेशोत्सवासाठी कांदिवली-मुंबई येथून श्रीवर्धन-कारविणेकडे चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या खासगी मिनीबसला श्रीवर्धन बोडणी भागात अपघात झाला. सुदैवाने बसमधील चाकरमान्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. बोडणी येथील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याबाजूला पलटी झाली. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव वडपाले येथे सकाळी बसला आग लागून अपघात झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.
कांदिवली येथून श्रीवर्धनकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्या खासगी मिनीबसला अपघात - bus comming from kandiwali to shrivardhan got fall aside road
कांदिवली येथून गणपती सणासाठी श्रीवर्धन कारविणे (वरची वाडी) येथील २५ ते ३० रहिवाशी खासगी मिनीबसने रात्री गावाकडे येण्यास निघाले होते. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस श्रीवर्धन बोडणी गावाच्या तीव्र उतारावर आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन अर्धवट पलटी झाली. सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.
![कांदिवली येथून श्रीवर्धनकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्या खासगी मिनीबसला अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4308297-thumbnail-3x2-pf.jpg)
कांदिवली येथून गणपती सणासाठी श्रीवर्धन कारविणे (वरची वाडी) येथील २५ ते ३० रहिवाशी खाजगी मिनीबसने रात्री गावाकडे येण्यास निघाले होते. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस श्रीवर्धन बोडणी गावाच्या तीव्र उतारावर आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन अर्धवट पलटी झाली. सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. बसमध्ये काही लहान मुलेही प्रवास करीत होते.
या अपघातांनातर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच श्रीवर्धन तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी धाव घेऊन परिस्थितीची पहाणी केली व प्रवाशांना सुखरूप घरी पोहचविण्यास मदत केली.