रायगड -अलिबाग रेवस मार्गावर जेएसडब्लू बस आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्यानगर चेंढरे येथे आज (शनिवारी) सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. केसरीनाथ पाटील (वय - 62 रा. खिडकी) असे मृताचे नाव आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस सकाळी अलिबागवरून रेवसकडे निघाली होती. तर केसरीनाथ पाटील हे रेवसकडून आपल्या दुचाकीवरून अलिबागकडे येत होते. पावणे दहाच्या सुमारास पाटील हे विद्यासागर चेंढरे परिसरातील रॉयल मोटर्स येथे आले असता समोरून येणाऱ्या जेएसडब्लू बसची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.