महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बसला अपघात, २ जण जखमी - Vivek More

बस चालक विवेक मोरे याचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ही बस बाजूच्या दुभाजकावर चढून समोर असलेल्या कंटेनरला धडकली.

अपघातग्रस्त बस

By

Published : Jul 16, 2019, 8:45 PM IST

रायगड -मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावर आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खालापूर जवळील माधवबाग येथे एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एक वयोवृद्ध प्रवासी आणि बस चालक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघातग्रस्त बस

मुंबईतील कुर्ला येथून ही एसटी बस (एमएच १४/ बीटी २४१०) जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने भीमाशंकरकडे जात होती. या बसमध्ये ५९ प्रवासी होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बस खालापूर जवळील माधवबाग येथे आली असता बस चालक विवेक मोरे याचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ही बस बाजूच्या दुभाजकावर चढून समोर असलेल्या कंटेनरला धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बबन तळेकर हे वयोवृद्ध आणि चालक विवेक मोरे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर खालापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना आणि प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले होते. तर जखमींना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे हलवण्यात आले. अपघातग्रस्त एसटी बसला कंटेनरद्वारे बाजूला करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details