रायगड - रविवारी सकाळच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर माणगावनजीक ढालघर फाटा येथे कंटेनर आणि प्रवासी बसेसमध्ये अपघात झाला. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले असून 7 जखमींना मुंबईला हलवण्यात आले आहे. तर, उर्वरीत जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरची प्रवासी बसेसना धडक, 30 प्रवासी जखमी - mumbai goa highway accident
रविवारी सकाळच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ढालघर फाटा येथे कंटेनर आणि प्रवासी बसेसमध्ये अपघात झाला. यात ३० प्रवासी जखमी झाले. यातील 7 जखमींना मुंबईला हलवण्यात आले असून उर्वरीत जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईकडून दापोलीच्या दिशेने दोन टेम्पो ट्रॅव्हलर बसेस प्रवासी घेवून निघाल्या होत्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कंटेनरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्याने या गाड्यांना धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहने पलटी झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर, यात अडकलेल्या प्रवाशी जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
हेही वाचा - जेएनपीटीमध्ये वाहतूकदारांचा संप यशस्वी; नवी मुंबई अन् रायगडमध्ये वाहतूककोंडी
TAGGED:
mumbai goa highway accident