महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड : विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू - Borgaon buffalo news

बोरगाव गावातील दामू उंदरू पाटील यांची म्हैस विजेचा धक्का लागून दगावल्याची घटना समोर आली आहे.

रायगड : विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

By

Published : Jun 9, 2021, 4:20 PM IST

रायगड - कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील दामू उंदरू पाटील यांची म्हैस विजेचा धक्का लागून दगावल्याची घटना समोर आली आहे.

शेतकऱ्याचे १ लाखांचे नुकसान
दामू पाटील यांचा परंपरागत दुग्धव्यवसाय आहे. नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास म्हशी माळरानावर चरत असताना अचानक पडलेल्या विजेच्या तारेमध्ये म्हैस अडकल्याने प्रचंड असा विजेच्या प्रवाहाचा धक्का बसून म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यात पाटील यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळेल - महावितरणचे आश्वासन
कळंब महावितरण अधिकारी पवार यांनी घटनास्थळी पाहणी करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवला आहे. संबंधित मालकास लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून जाईल, अशी ग्वाही महावितरण कळंब शाखा अभियंता पवार यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details