महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : उरण-पनवेल मार्गावरील उड्डाण पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

उरण पनवेल मार्गावरील दास्तान ते जासई शंकर मंदिर या सुमारे एक किलोमीटरच्या अंतरामध्ये उड्डाणपूल उभारण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यामध्ये उड्डाणपुलासाठी उभारण्यात आलेल्या वाय- कॉलमवरील बिमचे बांधकाम सुरू आहे. यावेळी लोखंडी सांगाडा कोसळल्याने सहा कामगार जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Nov 2, 2021, 9:11 PM IST

Updated : Nov 2, 2021, 9:33 PM IST

bridge collapse in Uran, One killed, six injured
उरणमध्ये पुलाचा भाग कोसळून एकाचा मृत्यू तर सहा गंभीर जखमी

रायगड -उरण पनवेल मार्गावरील जासई गावानजीक सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामातील वाय कॅपचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या अपघातांमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, सहा कामगार जखमी झाले आहेत. तर जखमींपैकी कामागारांमधून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुलाच्या पिलरवरील बीम भरण्याचे काम सुरु होते यावेळी ही दुर्घटना घडली.

VIDEO : उरण पनवेल मार्गावरील उड्डाण पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

लोखंडी सांगाडा कोसळल्याने झाला अपघात -

उरण पनवेल मार्गावरील दास्तान ते जासई शंकर मंदिर या सुमारे एक किलोमीटरच्या अंतरामध्ये उड्डाणपूल उभारण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यामध्ये उड्डाणपुलासाठी उभारण्यात आलेल्या वाय- कॉलमवरील बिमचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जासई गावानजीकच्या पिलरवरील बिम भरण्याचे काम करण्यात येत होते. याचवेळेस, सुमारे ४५ फूट उंचीवरील लोखंडी सांगाडा कोसळल्याने सहा कामगार जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. त्यातच, या अपघातामुळे लोखंडी सांगाडा हा रस्त्यावरून जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरवर कोसळून अपघात झाला आहे. तर, बिममधील लोखंडी सळया आणि काँक्रीट मटेरियल रस्त्यावर कोसळल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांनी देखील पाचारण करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढून जासई जेएनपीटी आणि नवी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा -

दरम्यान, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. तर, या अपघातामुळे उरण आणि पनवेलकडे जाणारी वाहतुक ही विस्कळीत झाल्याने सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे उरण आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक ही एका लेनने सुरू ठेवण्यात आली होती.

घटनास्थळी तहसीलदार, पोलीस, अग्निशमन दल दाखल -

मागील दोन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या बांधकामाबाबत आता प्रश्न उभे राहू लागले असून, कामात झालेल्या चुकांची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी तहसीलदार, पोलीस, अग्निशमन दल तसेच इतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ हजर झाल्या होत्या. मात्र जिनपिटीच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या पुलाच्या बांधकामात झालेल्या अपघाताची माहिती घेण्यास जेएनपीटी कडून तसेच संबंधित ठेकेदाराकडून कुणीही नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -विकृतीचा कळस : सावत्र बापानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; जन्मदात्या आईच्या मदतीने केले घृणास्पद कृत्य

Last Updated : Nov 2, 2021, 9:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details