रायगड- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान डोंगर फोडण्यासाठी भुसुरुंग स्फोट करण्यात आला. त्यामुळे पोलादपूर हद्दीतील चोळई गावातील घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महामार्ग चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटामध्ये भुसुरुंग स्फोट, 'चोळई'तील घरांना तडे
कशेडी घाटात चोळई आणि धामणदेवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आला. या स्फोटामुळे चोळई गावातील घरांना तडे गेले आहेत.
चोळईतील घरांना तडे
कशेडी घाटात चोळई आणि धामणदेवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आला. या स्फोटाच्या आवाजाने चोळई गावात भूकंपाप्रमाणे हादरा बसला. या स्फोटानंतर चोळई गावातील 10 ते 12 पक्क्या घरांना तडे गेले आहेत. पोलादपूर तहसील कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम करा, पण आम्हाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, अशी मागणी चोळई ग्रामस्थांनी केली आहे.