रायगडात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, एकाचा मृत्यू - जिल्हाधिकारी - रायगडात ब्लॅक फंगसचा शिरकाव
रायगड जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव, तीन रुग्ण बाधित आढळले होते. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
रायगड - कोरोनाच्या महमारीने आधीच थैमान घातले असताना जिल्ह्यात आता म्युकर मायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात पनवेल दोन तर खोपोली एक असे तीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एका रुग्णाचा म्युकर मायकोसिस आजाराने मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. म्युकर मायकोसिस आजारामध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे असून घरगुती तयार केलेल्या मास्क पूर्ण ड्राय झाल्यानंतरच वापरा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. जिल्ह्यात या आजाराच्या इंजेक्शनच्या साठा जिल्हा रुग्णालय आणि पनवेल महानगर पालिका रुग्णालयात उपलब्ध आहे असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.