रायगड– रोहे शहरातील अल्पवयीन गतीमंद मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक आणि रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
गतीमंद मुलीवर अत्याचार: प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.. भाजपने काढला मोर्चा - भाजप मोर्चा रायगड
गतीमंद मुलीवरील अत्याचाराप्रकरणी सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर गुन्हा दाखल होला. मात्र, आरोपीला अटक झाली नाही. अत्याचाराची तक्रार देण्यासाठी गेले असता, पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे.
गतीमंद मुलीवरील अत्याचाराप्रकरणी सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर गुन्हा दाखल होला. मात्र, आरोपीला अटक झाली नाही. अत्याचाराची तक्रार देण्यासाठी गेले असता, पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. अजूनही हे प्रकरण दडपून आरोपीला मदत होईल, अशी पोलिसांची भूमिका असून त्यांना राजकीय संरक्षण मिळते आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी माधवी नाईक यांनी केली आहे.