पेण (रायगड) -नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आगरी समाजाचे दिवंगत नेते, भूमिपुत्र व लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी पेणचे भाजपा आमदार रविशेठ पाटील यांनी केली. त्यासाठी पेण येथे साखळी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पेणकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला तीव्र विरोध केला.
भाजपा आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानापासून तहसील कार्यालयापर्यंत हे साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
'नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव द्या'
'ज्या व्यक्तीने स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यांच्या आंदोलन व प्रयत्नांमुळेच आज येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंड मिळाला. अशा अहोरात्र कष्ट घेणाऱ्या व्यक्तीचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेच पाहिजे', अशी भूमिका रवीशेठ पाटील यांनी घेतली.