महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खापोलीचे भाजपा नेते मंगेश काळोखे यांचा 500 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश - खालापूर

खोपोली शहरातील भाजपाचे नेते मंगेश काळोखे यांनी आपल्या 500 हून अधिक कार्यकर्त्यासह शिवसेनेत आज (रविवारी) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

मंगेश काळोखे
मंगेश काळोखे

By

Published : Jul 18, 2021, 10:40 PM IST

Updated : Jul 18, 2021, 10:52 PM IST

खालापूर (रायगड) -आगामी काळात खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात काही ठिकाणी निवडणूका पार होणार असल्याने सर्व राजकीय पक्षाची सत्ता स्थापित करण्यासाठी मोठे रस्सीखेच सुरू आहे. सर्व ठिकाणचे राजकीय पर्व चांगलेच तापू लागले आहे. त्यातच विविध पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील वरिष्ठांनी चांगलीच कंबर कसली असून खोपोली शहरातील भाजपाचे नेते मंगेश काळोखे यांनी आपल्या 500 हून अधिक कार्यकर्त्यासह शिवसेनेत आज (रविवारी) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

मंगेश काळोखे यांचा 500 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

खालापूर शिवसेनेत इनकमिंग सुरू

खालापूर तालुक्यातील राजकीय पर्वाची चर्चा सर्वत्र सुरूच असून त्यामुळे सगळ्यांचेच या तालुक्यातील निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉग्रेस, भाजपा, शेकाप, मनसे, आरपीआय, वंचित आघाडी यांच्यासह अन्य राजकीय पक्षात मोठी चुरस पाहायला मिळत असल्याने पदाधिकारी वर्गात एक प्रकारे रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील वरीष्ठ नेत्यासह कार्यकर्ते कंबर कसत असतात. त्यातच आगामी काळात खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात काही ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका संपन्न होणार आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी राजकीय पुढारी वेगवेगळे तंत्र अवलंबत आहे. यामुळे असंख्य कार्यकर्तेही आकर्षित होऊ लागल्याने शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत होत आहेत.

शिवसेनेची ताकद वाढणार?

भाजपा नेते मंगेश काळोखे यांनी आपल्या 500 हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केल्याने दिवसेंदिवस शिवसेनेची तालुक्यातील ताकद वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगेश काळोखेच्या शिवसेना प्रवेशाने खोपोली भाजपासह खालापूर तालुक्यातील भाजपाला मोठी खिंडार पडली आहे.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, ज्येष्ठ सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, सल्लागार नवीन घाटवल, भरत भगत, दशरथ भगत, संघटक संतोष भोईर, महिला जिल्हा संघटीका रेखा ठाकरे, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोंळबे, खालापूर तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, खोपोली शहरप्रमुख सुनिल पाटील, खालापूर पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर, माजी उपसभापती कर्जत मनोहर थोरवे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील अमर मिसाळ, शहर अधिकारी संतोष मालकर, ज्येष्ठ नेते सुदाम पवाळी, शिवराम दबे, तालुका महिला संघटीका रेश्मा आंग्रे, प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, खोपोली नगराध्यक्षा विनिता औटी, नगरसेवक, संकेत भासे, दिलीप पुरी, जनार्दन थोरवे आदीप्रमुखांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Jul 18, 2021, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details