महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्हा कोकणात नाही का? भाजपा जिल्हाध्यक्षाचा मुख्यमंत्र्यांना सवाल - महेश मोहिते

तौक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला. मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला झुकते माप देत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा टाळला असल्याचा आरोप रायगड दक्षिणचे भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केला आहे.

bjp-destrict-president-attacked-on-cm-for-not-visiting-raigad-district
महेश मोहिते

By

Published : May 23, 2021, 7:13 AM IST

रायगड -तौक्ते चक्रीवादळचा मुंबईसह कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रिवादळाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला. मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला झुकते माप देत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा टाळला असल्याचा आरोप रायगड दक्षिणचे भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी केला आहे. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या अनेकांना अद्याप पैसे भेटले नसल्याने रायगडकर जाब विचारतील, या भीतीने दौरा टाळला का? तसे कोकणातून रायगड जिल्ह्याला का वगळले? असा सवालही मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रायगडातून केली दौऱ्याची सुरुवात-

तौक्ते चक्रीवादळानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान ग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दोन दिवस कोकण दौरा केला. त्यांनी दौऱ्याची सुरुवात रायगडपासून केली. जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांच्या दुःखावर फुंकर घातली. कोकणातही जाऊन त्यांनी नागरिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना धीर दिला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडात येण्याचे टाळले, असंही महेश मोहिते म्हणाले.

रायगड दक्षिणचे भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते बोलतााना..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रायगडला कोकणातून का वगळले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. हा दौरा तीन तासांत पूर्ण करून पुन्हा मुंबईत दाखल झाले. रायगड हा कोकणातील जिल्हा आहे. रायगडलाही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मात्र जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्र्यांनी टाळला. गेल्यावर्षी 3 जुन रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात मोठी हानी झाली. मात्र महाविकास आघाडी सरकारने मदतीच्या नावाने पाने पुसली. अद्यापही अनेकांना नुकसान भरपाईची रक्कम भेटलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिक सवाल विचारतील म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड दौरा टाळला का आणि कोकणात रायगड जिल्हा नाही का? असा सवाल रायगड दक्षिणचे भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details