रायगड - राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात आज भाजपच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अलिबाग येथे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते व तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात 150 कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रामुख्याने शेतकर्यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील योजना व कामांना देण्यात आलेली स्थगिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्यात तहसील कार्यालयांसमोर भाजपचे धरणे आंदोलन - रायगड भाजपचे आंदोलन
राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभाराविरोधात भाजपच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अलिबाग येथे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते व तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रायगड जिल्ह्यात तहसील कार्यालयांसमोर भाजपाचे धरणे
आज राज्यात भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात आदोलन करण्यात आले. शेतकरी कर्ज माफीत शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील अत्याचार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील योजना व कामांना देण्यात आलेल्या स्थगितीच्या वीरोधात हे आदोलन करण्यात आले.