महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर 'बर्निंग बाईक'चा थरार - मुंबई-गोवा महामार्ग बातमी

प्रतापगड येथून महाडकडे निघालेल्या एका तरुणाच्या दुचाकीला आग लागली. यात दुचाकी जळून खाक झाली आहे.

दुचाकी
दुचाकी

By

Published : Mar 2, 2021, 6:50 PM IST

Updated : Mar 2, 2021, 8:04 PM IST

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर आज (2 मार्च) बर्निंग बाईकचा थरार अनुभवायला मिळाला. महाड एसटी स्टँड समोरील चांभारखिंड येथे धावत्या मोटारसायकलला अचानक आग लागली. या आगीत मोटार सायकल जळून खाक झाली. मोटार सायकलस्वार हा बचावला आहे.

घटनास्थळ

मुंबई गोवा महामार्गावर बर्निग बाईक थरार

अमित जाधव हा आपल्या मोटार सायकलवरून प्रतापगड येथून महाडकडे निघाला होता. मुंबई-गोवा महामार्गावर चांभार खिंड येथे आल्यावर मोटारसायकलमधून धूर येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्वरित गाडी थांबवली. गाडीवरून उतरून अमित दूर उभा गेला. काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि गाडी जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. महाड नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आगीवर नियंत्रण मिळवत गाडी बाजूला केली. पण, तोपर्यंत गाडीचा केवळ सांगाडा उरला होता. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

हेही वाचा -रायगड जिल्ह्यात आतापर्यत दीडशे ज्येष्ठ नागरिकांनी घेतली कोरोना लस

Last Updated : Mar 2, 2021, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details