महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवभक्‍तांसाठी आनंदाची बातमी, रायगडावर महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक होता येणार - रायगड शिवाजी महाराज पुतळा न्यूज

शिवभक्‍तांना आता थेट तख्‍तावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेता येणार आहे. महाराजांसमोर नतमस्‍तक होता येणार आहे. तख्‍ताकडे जाणारे बॅरिकेट्स आता हटवण्‍यात आले आहेत. यामुळे शिवभक्‍तांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे.

barricades removed in front of the statue of shivaji maharaj at raigad
शिवभक्‍तांसाठी आनंदाची बातमी, रायगडावर महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक होता येणार

By

Published : Feb 24, 2021, 9:49 PM IST

रायगड - किल्‍ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्‍तांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शिवभक्‍तांना आता थेट तख्‍तावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेता येणार आहे. महाराजांसमोर नतमस्‍तक होता येणार आहे. तख्‍ताकडे जाणारे बॅरिकेट्स आता हटवण्‍यात आले आहेत. यामुळे शिवभक्‍तांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षे शिवभक्‍त आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यात बॅरीकेडसचा अडथळा होता. हा अडथळा आता दूर झाला आहे.

रायगडावर महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक होता येणार
शिवभक्तांनी बॅरिकेट्स हलविण्याचा केली होती मागणी
किल्ले रायगडावर आल्यानंतर राज दरबारातील मेघडबरीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसलेला पुतळा आहे. मात्र गेली काही वर्षे तख्तावर जाऊन महाराजांचे दर्शन घेणे बंद करण्यात आले होते. यासाठी राजदरबारातील तख्ताच्या पायऱ्यांवर बॅरिकेट्स पुरातत्व विभागाने बसविले होते. त्यामुळे दुरूनच महाराजांचे दर्शन शिवभक्तांना घ्यावे लागत होते. राजदरबारातील तख्‍ताच्‍या पायऱ्याजवळच हे बॅरिकेट्स उभारण्‍यात आले होते ते बाजूला करावेत, अशी शिवभक्‍त सातत्‍याने मागणी करत होते. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांची ही मागणी पूर्ण केली आहे.

जागेचे पावित्र्य राखा
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मंगळवारी किल्‍ले रायगडला भेट दिली. तेथील अधिकाऱ्याशी चर्चा करून हे बॅरीकेटस हटवून मेघडंबरीच्‍या जवळ उभारण्‍यात आले आहेत. लवकरच या ठिकाणी ऐतिहासिक पद्धतीचे बॅरीकेटस उभारले जाणार आहेत. मात्र महाराजांचे जवळून दर्शन घेताना जागेचे पावित्र्य राखले जावे, सेल्‍फी काढू नये, शिवपुतळ्याकडे पाठ करून उभे राहू नये, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्‍यक्‍त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details