रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे. यासाठी विविध नेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा केला आहे. आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात रायगडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना, 'मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासन अडकून पडणं हे जरी खरं असलं, तरी लोकांच्या भावना जाणून घेणं गरजेचं आहे,' असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक खात्याचे मंत्री आपापल्या खात्याशी संबंधित नुकसानीचा आढावा घेत असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
'आम्हालाही मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगायचंय'
निसर्ग चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर येत आहे. यासाठी विविध नेत्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा केला आहे. आज राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात रायगडच्या दौऱ्यावर आहेत.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात रायगडच्या दौऱ्यावर आहेत.
एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात. हे तर तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळं थोड्याफार कुरबुरी असणारच, असे ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी सोमवारची वेळ दिल्याचे त्यांनी सांगितले.
Last Updated : Jun 13, 2020, 2:27 PM IST