रायगड- आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून वारकरी पंढरपुरी जात असतात. अलिबाग वरसोली येथील आंग्रे कालीन प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर अतिशय पुरातन आहे. रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली या भागातील वारकरी दिंड्या घेऊन येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी विठ्ठल, रखुमाई, वासुदेव, वारकरी वेशभूषेत आलेल्या लहान मुलांच्या बालदिंडीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विठूरायाच्या गजरात बाल वारकरी दंग, बालदिंडी काढून घेतले विठुरायाचे दर्शन
अलिबाग मधील प्रति पंढरपूर असलेले वरसोली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आज बच्चे कंपनी बालदिंडी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेली होती. रखुमाई, वासुदेव, वारकरी वेशभूषेत आलेल्या लहान मुलांच्या बालदिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
अलिबाग मध्ये लहान मुलांच्या बालदिंडीचे आयोजन
विठुरायाच्या दर्शनाची आस मोठ्यांना लागली होती तशी या बच्चे कंपनीलाही होती. यामुळे अलिबाग शहरातील किडज या शाळेतील विद्यार्थी बालकांची बालदिंडी यावेळी काढण्यात आली होती. विठ्ठल रखुमाई, वासुदेव, वारकरी तसेच टाळ, वीणा अशा वेशभूषेत आलेल्या या बालदिंडीने विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी या बालदिंडीतील या गोंडस मुलाचे फोटो काढण्याचा मोह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आवरता आला नाही.