रायगड - जिल्ह्यातील वागेश्वर गावातील रहिवासी असलेल्या बबन झोरे या तरुणाने ऑल इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे बबनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. झारखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत बबन झोरे याने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
खालापुरातील बबन झोरेने पटकावले ऑल इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक - Raigad District Latest News
जिल्ह्यातील वागेश्वर गावातील रहिवासी असलेल्या बबन झोरे या तरुणाने ऑल इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे बबनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. झारखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत बबन झोरे याने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
बबन झोरेने पटकावले सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय पातळीवर बबन करणार भारताचे नेतृत्व
राज्याचे नेतृत्व करत असताना बबनने झारखंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत, 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशामधून खेळाडू सहभागी झाले होते. दरम्यान या स्पर्धेत झोरे याने चमकदार कामगिरी केल्यामुळे आता त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, भारताचे नेतृत्व करण्याचे जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.